Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी गावात गुढीपाडव्याच्या पवित्र आणि मंगलमय दिवशी ‘श्री समर्थ ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस’चा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्षम नगरसेवक संदीपभाऊ वाघेरे आणि उत्तमराव कुदळे यांच्या शुभहस्ते या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला परिसरातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावून उपक्रमाचे कौतुक केले. यामध्ये माजी नगरसेवक रंगनाथशेठ कुदळे, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ कुदळे, गुलाबराव सोनवणे, सुनील कुदळे, दत्तात्रय बाणेकर, अनिल कुदळे, प्रकाश बाणेकर, आनंद कुदळे, नंदू कुदळे, चारुदत्त मोहिते आणि कैलास सोनवणे यांचा समावेश होता.
या नव्याने सुरू झालेल्या रुग्णवाहिकेमुळे पिंपरी परिसरातील नागरिकांना २४ तास तत्पर आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे. ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन सुविधा, आईस बॉक्स तसेच अनुभवी तज्ञांची मदत यांसारख्या अत्यावश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेत आणि सुरक्षित उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

या सेवेद्वारे सर्वसामान्य नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळणे ही अभिमानाची बाब असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली. समाजसेवेच्या भावनेतून सुरू करण्यात आलेली ही ॲम्ब्युलन्स सेवा भविष्यात अनेक रुग्णांसाठी जीवनदायी ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: ९१५८९८५५६६
📍 श्री समर्थ ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस, पिंपरी गाव

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version