Spread the love

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी घरकुल लाभार्थ्यांना भेडसावणाऱ्या मजुरी तसेच कातकरी समाजाच्या घरकुल योजनांशी संबंधित विविध समस्यांबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली.

बैठकीत आदिवासी घरकुल लाभार्थ्यांना मजुरी मिळण्यात होणारा विलंब, दुर्गम भागातील अडचणी तसेच कातकरी समाजाच्या घरकुल योजनांच्या अंमलबजावणीतील अडथळ्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित समस्या तातडीने सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबतही बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.

या बैठकीस आमदार स्नेहा दुबे, आमदार उमा खापरे, आमदार निरंजन डावखरे तसेच आदिवासी विकास विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. आदिवासी घरकुल योजनांचा लाभ दुर्गम भागातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version