पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे शिल्पकार व राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी (पिंपरी) येथे गुरुवार (दि.१२ मार्च) रोजी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, यशवंतराव चव्हाण हे समतोल विकासाचे पुरस्कर्ते होते. औद्योगिक विकासाची योजना आखताना त्यांनी अविकसित भागांना प्राधान्य दिले. ग्रामीण भागात उद्योग सुरू करून शेती आणि उद्योग यांची सांगड घालत त्यांनी ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेला चालना दिली. महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या नियोजनात त्यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रसंगी महिला अध्यक्षा कविता आल्हाट तसेच माजी नगरसेविका सीमा सावळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष अकबर मुल्ला यांनी मानले.
या कार्यक्रमाला शहराध्यक्ष योगेश बहल, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, मुख्य सरचिटणीस विनायक रणसुभे, नगरसेविका उज्वला ढोरे, दिप्ती कांबळे, वर्षा जगताप, माजी नगरसेविका सीमा सावळे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, शहर उपाध्यक्ष दत्तात्रय जगताप, अभिजीत आल्हाट, शेरबहादुर खत्री, शक्रुल्ला पठाण, अकबर मुल्ला, संपतराव पाचुंदकर, चिंचवड विधानसभा महिला अध्यक्षा संगीता कोकणे, भाग्यश्री मस्के, बाबासाहेब चौधरी, सरचिटणीस सुरेंद्रसिंग बाला, सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, वाहतूक सेल अध्यक्ष विनोद वरखडे, ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत महाजन, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी, कोमल कवडे, सरचिटणीस बापू सोनवणे, सामाजिक न्याय कार्याध्यक्ष कुमार कांबळे, धनाजी तांबे, सुनिल अडागळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
