Spread the love

 

आरोपींची सव्वा कोटींची मालमत्ता जप्त; फसवणुकीची रक्कम वसूल करण्यासाठी प्रशासनाची पावले

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पुणे जिल्ह्यातील हिंजवडी आयटी पार्कमधील ‘फ्लायनॉट सास प्रा. लि.’ (Flynaut Saas Pvt. Ltd.) या कंपनीने शेकडो सुशिक्षित बेरोजगार तरुण पदवीधरांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडवल्याचे प्रकरण समोर आले होते. या गंभीर विषयावर आमदार  शंकर जगताप  यांनी आक्रमक भूमिका घेत विधानसभेत (दि . 10) तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत आता या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

आमदार शंकर जगताप यांनी तारांकित प्रश्नाच्या (प्रश्न क्रमांक २७८६८) माध्यमातून हिंजवडी आयटी पार्कमधील ‘फ्लायनॉट सास प्रा. लि. कंपनीने बेरोजगार तरुण पदवीधारकांच्या केलेल्या फसवणुकीचा मुद्दा सभागृहासमोर मांडला होता. याविषयी माहिती देताना त्यांनी  की, हिंजवडी आयटी पार्क येथील ‘फ्लायनॉट सास प्रा. लि. या  कंपनीने ऑगस्ट २०२५ मध्ये  वेगवेगळ्या कन्सल्टीच्या माध्यमातून  फ्रेशर्स इंजिनीअर उमेदवारांना मोठ्या वार्षिक पगाराचे अमिष दाखवले. तसेच उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात आगऊ रक्कम स्वीकारून त्यांना कामाला लावतो, अस सांगून आणि विश्वास संपादन केला. नियुक्तीपूर्वी ट्रेनिंग आणि इतर कारणांसाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून १ लाख ते २.५० लाख रुपयांपर्यंतची रक्कम कंपनीच्या बँक खात्यावर भरून घेण्यात आली. त्यानंतर काही महिने ऑनलाइन काम करून घेतले. परंतु प्रत्यक्षात पगार दिला नाही. शेवटी पात्रता परीक्षा किंवा इंटरव्ह्यूमध्ये नापास झाल्याचे कारण देऊन अनेक विद्यार्थ्यांना कंपनीत रुजू करून घेण्यास नकार दिला.सोबतच फ्रेशर्स उमेदवारांची कोट्यावधी रुपयाची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणात हिंजवडी पोलीस स्टेशन येथे उपेश रंजीत पाटील आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांना विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची गांभीर्यता शासनाच्या निदर्शनास आणून दिली.

दरम्यान दोषींवर काय कारवाई करण्यात आली असून, विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली रक्कम त्यांना परत मिळण्याबाबत कोणती पावले उचलली जात आहेत. असे आमदार जगताप यांनी विचारले, त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, हिंजवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच आता पोलीस उपायुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

आरोपींची सव्वा कोटींची मालमत्ता जप्त

हिंजवडी आयटी पार्क येथील या फसवणूक प्रकरणात केवळ गुन्हे दाखल करून न थांबता, पीडित विद्यार्थ्यांची रक्कम परत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने कठोर पवित्रा घेतला आहे असे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. या आतापर्यंत ३५७ पीडितांची ६ कोटी ४९ लाख ९६ हजार ७३१ रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी, ‘फ्लायनॉट सास प्रा. लि.’ कंपनीचे संस्थापक आणि कार्यरत कर्मचारी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करत असतानाच, त्यांची १ कोटी २७ लाख २५ हजार ७८० रुपयांची मालमत्ता आतापर्यंत जप्त करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे ४८ लाख २५ हजार ७८० रुपये किमतीच्या जंगम मालमत्तेचा  आणि ७९ लाख रुपये किमतीच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे. फसवणुकीच्या पैशातून घेतलेल्या या मालमत्तेवर टाच आणून, कायदेशीर प्रक्रियेद्वारे ही रक्कम पुन्हा बाधित विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी विशेष तपास पथकामार्फत (SIT) पुढील प्रक्रिया राबवली जात आहे.

“आयटी क्षेत्रातील तरुणांची होणारी ही फसवणूक अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाचा तपास केवळ कागदावर राहू नये, तर प्रत्येक पीडित विद्यार्थ्याला त्याचे हक्काचे पैसे परत मिळावेत आणि अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या टोळ्यांवर जरब बसवावी, हीच माझी  प्रमुख मागणी आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे एसआयटीच्या माध्यमातून आता या प्रकरणाचा छडा लागेल.”असा विश्वास आहे .

शंकर जगताप, आमदार (चिंचवड विधानसभा मतदारसंघ)

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version