Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील घरेलू कामगारांनी आज अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चा काढून मोठ्या घोषणा देत आपल्या मागण्यांचा आवाज बुलंद केला.

महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समिती, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र आयोजित मोर्चामध्ये ,निमंत्रक राजू वंजारे, ज्ञानेश पाटील,कामगार नेते काशिनाथ नखाते,संतोष विभुते,महिलाध्यक्षा माधुरी जलमूलवार,जिल्हाध्यक्ष रुक्मिणी जाधव,लाला राठोड, सुनील भोसले,सुमित्रा जैसवाल, सुनंदा लोंढे,नंदा जाधव,कलावती शिंदे,अर्चना शिंदे,शितल धनगर,शोभा सरोदे,उषा दोडके,बिस्मिल्ला शेख
आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यातील घरेलू कामगारांचे विविध प्रश्न आहेत, मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज मोठ्या संख्येने घरेलु कामगार सहभागी झाल्या. घरेलू कामगार मंडळ सुस्थितीत पुनर्जीवित करावे, मंडळामध्ये नोंदणी असूनही त्यांना लाभ मिळत नाही त्यांना लाभ सुरू करावे, घरेलू कामगारांना पेन्शन योजना सुरू करावी. घरेलू कामगारांना ईएसआयसी योजना लागू करावी. किमान वेतन मिळावे त्याचबरोबर घरेलू कामगारांना १ हजार कोटीची तरतूद करावी या मागण्या घेऊन महाराष्ट्रातल्या घरेलू कामगारांनी आंदोलन केले असता कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी अधिकारी यांच्यासमवेत पुढील आठवड्यामध्ये बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version