Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – ओम साई या संस्थेतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील विविध क्षेत्रातील ४५ महिलांनी याचा लाभ घेतला. सहली दरम्यान महिलांचा सत्कार करतांना या सहलीच्या आयोजका नेहा कुलकर्णी म्हणाल्या, “आमच्या दृष्टीने प्रत्येक महिलेचे आपले एक विश्व असते. आणि ती त्या विश्वाची जन्मदात्री असते. म्हणून प्रत्येक महिला सत्कारास पात्र आहे.”या प्रसंगी ४५ महिलांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना रजनी अहेरराव म्हणाल्या, “स्त्रि म्हणजे निसर्गाची सर्वांग सुंदर निर्मिती आहे. समाजाने कितीही बंधने घातली, तरी तिने स्वतःचा मार्ग तयार करून एक वेगळी वाटचाल केली आहे.”

उज्जला केळकर, मिसेस चटर्जी वर्सेस नार्वे या सिनेमाचे उदाहरण देत म्हणाल्या, आपल्या देशाच्या संस्कारात राहून महिला बरेच काही साध्य करू शकतात.”
या सहली दरम्यान मेडिटेशन, जेवण, नास्ता, संगीत खुर्ची, रेनडान्स या सर्व गोष्टीचा आनंद घेतला.
ही विनामूल्य प्रवास सेवा होती. या वेळी “महिलांची तयारी असेल तर ओम साई कायम अशा सहली काढत राहून महिलांना प्रोत्साहित करु” असा शब्द आयोजका कडून देण्यात आला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version