Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संघवी केशरी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मध्ये ‘मराठी भाषा गौरव दिनाचा’ कार्यक्रम,मराठी विभागाकडून आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन,ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) व, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळेस सावित्रीबाई फुले पुणे,’विद्यापीठ गीत’ व ‘मराठी भाषा अभिमान गीत’ यांचे गायन करण्यात आले.

या दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयात ‘काव्यसंमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते. या काव्य संमेलनामध्ये सुप्रसिद्ध हास्य कवी बंडा जोशी यांनी विविध विडंबनात्मक कवितांचे सादर करून श्रोत्यांचे मने जिंकली. कवी देवा झिंजाड त्यांची सुप्रसिद्ध कादंबरी ‘एक भाकर तीन चूली’आहे. या कादंबरीला अनुसरून वात्सल्य प्रेमाच्या प्रतीक असणाऱ्या ‘आई’ या विषयावर विविध कवितांचे सादरीकरण केले. कवी संतोष पावरा यांनी आदिवासी समाज, संस्कृती आणि संघर्ष या विषयासंदर्भात पारंपरिक आदिवासी ‘पावरा’ बोलीभाषेतील कवितांचे सादरीकरण केले. कवयित्री डॉ.लता ऐवळे-कदम यांनी त्यांची सुप्रसिद्ध कविता ‘धागा’आणि ‘बाप’ या कवितेच्या सादरीकरणातून मानवी जीवनातील बहिण-भाऊ आणि वडील- मुलगी यांच्या नात्याचे गुंफण करणारे भावनिक सादरीकरण केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल.डोंगरे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रवीण जावीर यांनी केले.

मान्यवरांचा परिचय डॉ. सचिन ओहोळ, प्रा.धिरज शाखापुरे, प्रा. नितीन जाबरे आणि प्रा. सोनम गावंडे यांनी दिले.
कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन डॉ. संतोष काशिद यांनी केले. मराठी भाषा दिनाचे फलक लेखन प्रा.प्रसाद झुंडरे यांनी केले तसेच सुंदर, मनमोहक रांगोळी विद्यार्थिनी साक्षी घरमोडे यांनी काढली त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अभिषेक आकणकर यांनी केले.

कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र राज्यगीताने झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version