Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम हे महापालिका सेवेतून २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे शहर अभियंता निकम यांच्या कडील विविध विभागांचा कार्यभार तात्पुरता स्वरूपात महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, सह शहर अभियंता मनोज सेठिया आणि सुनील भागवानी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे, याबाबतचे आदेश आज निर्गमित केलेले आहेत.

सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशानुसार मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या पाणी पुरवठा व प्रकल्प विभागासह स्थापत्य विभागाच्या अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी सोपवि,ण्यात आली आहे. सह शहर अभियंता मनोज सेठिया यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या स्थापत्य मुख्य कार्यालय विभागासह उद्यान व क्रीडा स्थापत्य, शहरी दळणवळण या विभागांचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

तसेच सह शहर अभियंता सुनील भागवानी यांच्याकडे त्यांच्याकडील सध्याच्या विभागासह बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version