Spread the love
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी भक्ती शक्ती बी आर टी मार्गाचे उदघाटन करा अन्यथा उद्घाटन करून रस्ता नागरिकांना वाहतूक सुरू करण्यासाठी खुला करण्याचा इशारा भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्तांना केला आहे.
भक्ती शक्ती बी आर टी ते रावेत रेल्वे उड्डाणपूल मुखाई चौक हा मार्ग काम संपुर्ण झाले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी राजकीय नेते मंडळी उद्घाटनप्रसंगी उपस्थित रहात नाही म्हणून वाहतूक सुरू करण्यासाठी बंद ठेवण्यात आला.
हजारो नागरिकांना रस्ता वापर करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी हा बी आर टी मार्ग बंद ठेवण्यात आला असून सदर रस्ता काम आठ वर्ष रखडलेले होते.
सध्या निगडी भक्ती शक्ती बी आर टी ४५ मीटर रस्ता काम संपुर्ण झाले असून फक्त आठ ते दहा मिनिटात निगडी ते मुकाई चौक अंतर पार करता येणार असून वाहतूक कोंडी प्रश्न संपुष्टात आला असून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांच्या विनंती नुसार राजकीय नेते व पुणे जिल्हा पालकमंत्री उद्घाटनप्रसंगी उपस्थित रहात नसल्याने निगडी भक्ती शक्ती बी आर टी मार्ग उद्घाटन थांबले असून येत्या आठ दिवसांत पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी रस्ता नागरिकांना सुरू केला नाही तर त्या ठिकाणी उद्घाटन करून रस्ता नागरिकांना वाहतूक सुरू करण्यासाठी खुला करण्यात येईल,असा इशारा दिला आहे.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version