भोसरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी -येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न प्रीतम प्रकाश महाविद्यालय या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र शैक्षणिक वर्ष २०१५ पासून सुरू असून अभ्यास केंद्रामध्ये बी.ए. बी.कॉम, एम.ए. (मराठी. अर्थशास्त्र, इतिहास,राज्यशास्त्र, इंग्रजी), एम कॉम, एमबीए या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या दोनशे चौदा विद्यार्थ्यांचा (स्नातकांचा) पदवीग्रहण समारंभ पार पडला सदर पदवीग्रहण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रवी लांडगे तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव व विद्यमान प्रशासकीय सल्लागार मा. उत्तमराव जाधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी च्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. अशोककुमार पगारिया होते. मंचावर शाहु शिक्षण संस्थेचे अजय साळुंखे, प्राचार्य डॉ. सदाशिव कांबळे, केंद्र समन्वयक प्रा. पांडुरंग भास्कर तसेच इतर प्राध्यापक बंधु भगिनी आणि विद्यार्थी (स्नातक) मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा.पगारिया म्हणाले, दैनंदिन काम सांभाळून आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक करावे वाटते. ही केवळ पदवी नसून आपल्या भविष्यातील वाटचालीचे पंख आहेत. . यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कुलसचिव व विद्यमान प्रशासकीय सल्लागार उत्तमराव जाधव यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना आपले शिक्षण पुढे सुरू ठेवण्याचे आवाहन केले. दूरस्थ शिक्षण पद्धतीने अनेक नोकरी, व्यवसाय करणारे, गृहिणी व परिस्थितीनुसार शिक्षण थांबलेले विद्यार्थी यांना आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. असे प्रतिपादन केले. या केंद्राचा निकाल शंभर टक्के लागलाअसून हे केंद्र गेली अकरा वर्षापासून महाविद्यालयात चालू असून आज पर्यंत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वतीने या केंद्रामध्ये सुमारे २५०० पेक्षा जास्त विद्यार्थी विविध अभ्यासक्रमामध्ये पदवी घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा पांडुरंग भास्कर यांनी ही माहिती दिली.. तसेच प्राचार्य डॉ.सदाशिव कांबळे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा परिचय करून दिला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सराफ यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा. रेणु आगरवाल यांनी केले.
कार्यक्रमासाठी प्रा. सुधाकर बैसाणे प्रा. सचिन पवार , प्रा उमेश लांडगे , सारिका बेलदोर ग्रंथपाल प्रा. राजेश कुंभार या़ंचे व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले
