Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी “सीए महावीर अशोकलाल कोठारी” यांची 2026-27 या कालावधीसाठी निवड करण्यात आली. निगडी येथील सीए संस्थेच्या कार्यालयात नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणूकीत त्यांची निवड जाहीर करण्यात आली. मावळते अध्यक्ष सीए वैभव मोदी यांच्याकडून “सीए महावीर कोठारी” यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.

संस्थेचे नियुक्त केलेल्या अन्य पदाधिकारयांमध्ये सीए मनोज मालपाणी (उपाध्यक्ष), सीए सारिका चोरडीया (सचिव),सीए धीरज बलदोटा( खजिनदार तथा सीए विद्यार्थी संघटना अध्यक्ष), समिती सदस्य सीए शैलेश बोरे,सीए सचिन ढेरंगे यांचा समावेश आहे.

संस्थेच्या वतीने सीए सदस्य आणि विद्यार्थ्यासाठी कार्यशाळा आयोजन करणे,कर विषयक ज्ञान प्रसार, परिसंवाद,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि इतर समाज उपयोगी उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार असल्याची माहिती नवनियुक्त अध्यक्ष “सीए महावीर कोठारी” यांनी दिली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version