Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मराठी दिवस 27 फेब्रुवारी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळेतील पालक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अर्चन मिटकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात सूत्रसंचालन सारिका देशमुख यांनी प्रभावी शब्दांत केली. त्यानंतर सर्व शिक्षकवृंदांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

इयत्ता ७ वीतील विश्वजीत काटे याने सादर केलेल्या जोशपूर्ण पोवाड्याने कार्यक्रमात उत्साह निर्माण केला. त्यानंतर निशा मॅम यांनी मराठी भाषेचे महत्त्व विशद करणारे अभ्यासपूर्ण भाषण केले.

इयत्ता ९ वीतील शर्वरी काटे व दीपिका राठोड यांनी मराठी भाषेवरील आपले विचार प्रभावीपणे मांडले. इयत्ता ८ वीतील मानिषा चौधरी व स्वामिनी हिबाणे यांनी सादर केलेल्या ओवींनी साहित्यिक वातावरण निर्माण केले.

इयत्ता ४ थीतील अदिती महाडे  यांच्या भाषणांतून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास दिसून आला. इयत्ता ७ वीतील विद्यार्थिनी अनिता परमारश्रुष्टी साबळे व निकिता प्रजापती यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची विशेष दाद मिळवली.

यानंतर चेतना मॅम यांनी प्रेरणादायी मराठी भाषण केले. इयत्ता ५ वीतील मानस काळे यांनी आपले विचार सुस्पष्टपणे मांडले.तसेच इयत्ता ५ वीतील इशानी सोळंखे यांच्या भाषणाने कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.

कार्यक्रमाचा समारोप अनिता मॅम यांनी सादर केलेल्या भावपूर्ण पसायदानाने झाला. शेवटी उर्मिला मॅम यांनी आभार प्रदर्शन करून प्रमुख पाहुणे, मान्यवर, शिक्षकवृंद व सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.मराठी भाषेचा अभिमान, संस्कृती व साहित्याची ओळख करून देणारा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version