Spread the love

 

सरकारच्या चुकीच्या धोरणाने कामगारांचा घात

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव जवळील ‘एवनीरा’ परिसरातल्या एस.बी.एल. एनर्जी लिमिटेड या दारुगोळा बनवणाऱ्या डिटोनेटर कंपनीत आज सकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. येथे भीषण साखळी स्फोटात १४ महिलांसह ३ पुरुष असे १७ कामगारांचा मृत्यू झाला यात आणखी १८ कामगार भीषण गंभीर जखमी झाले. सरकारच्या उद्योगस्नेही धोरणाचा हा परिणाम असून कामगार कामगारांची सुरक्षा वाऱ्यावर सोडल्याचा परिणाम आहे; मृतांच्या वारसांना २० लाख रुपये देण्यात यावे. व त्यांच्या पाल्याच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घ्यावी, तसेच अशा घटना रोखण्यासाठी सरकारी उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र कडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की नागपूर येथील स्फोटानंतर लागलेल्या भीषण आगीत अनेक कामगार गंभीररित्या भाजले आहेत. जखमींपैकी १८ जणांना रुग्णालयात दाखल केले असून अनेकजण ५० टक्क्यांच्या वर भाजले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भिती व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे. या राबणाऱ्या कष्टकरी महिलांच्या आणि पुरुष कामगारांच्या देहाच्या अक्षरशः चिंधड्या उडाल्या आहेत अशीच घटना पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा २०२३ मध्ये अगदी असेच घडले होते. यात १४ कामगारांचा मृत्यू झाला होता यावरून सरकारने व कामगार विभागाने कुठलेही ठोस पावले उचलले नाहीत, आम्ही वारंवार कामगार सुरक्षा बद्दल मागणी करत आहोत परंतु सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे कामगार कामगारांकडे आणि त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने केलेले सहन केले जाणार नाही असेही नखाते यांनी स्पष्ट मत व्यक्त केले

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version