क्षेत्रीय कार्यालयांच्या संख्या वाढीस राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध; नगरसेवक जितेंद्र ननावरे यांची भूमिका
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरात दोन नवीन क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्याच्या प्रस्तावाला यांनी विरोध दर्शविला असून, असे मत नगरसेवक यांनी मांडले.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन आज महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात करण्यात आले होते. त्यावेळी जितेंद्र ननावरे यांनी मुद्दे उपस्थित केले.
अपुरा आर्थिक पुरवठा, मनुष्यबळाची कमतरता आणि स्वतंत्र प्रशासकीय इमारतींचा अभाव या पार्श्वभूमीवर नवीन कार्यालये निर्माण केल्यास प्रशासनावर अतिरिक्त ताण येईल आणि नागरिकांच्या कामांमध्ये अडथळे निर्माण होतील, असे ननावरे यांनी स्पष्ट केले.
“नवीन क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्यापेक्षा विद्यमान कार्यालये अधिक सक्षम करून त्यातूनच नागरिकांना दर्जेदार व सहज सेवा उपलब्ध करून द्यावी,” असे ते म्हणाले. २०१७ मध्ये स्थापन झालेल्या क्षेत्रीय कार्यालयांचा अनुभव सांगताना त्यांनी नमूद केले की, त्या वेळी जवळपास तीन वर्षे नागरिकांना आपला प्रभाग कोणत्या कार्यालयात येतो, याची स्पष्ट माहिती नव्हती आणि प्रशासनाची घडी बसायला मोठा कालावधी लागला.
नवीन कार्यालये सुरू करण्यापूर्वी आर्थिक तरतूद, आवश्यक मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली. अन्यथा हा निर्णय घाईघाईत घेतल्यास नागरिकांना पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागू शकतो, असा इशारा ननावरे यांनी दिला.
