Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -+पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथील स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक कैलास (बाबा) बारणे यांना सभागृहात स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत नगरसेविका योगिता महेश बारणे यांनी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, प्रभाग क्रमांक २३ थेरगाव गावठाण येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलमधून उमेदवारी देताना कैलास बारणे यांनी पक्ष संघटना बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला. निवडणूक काळात त्यांनी संपूर्ण पॅनेलचे नेतृत्व करत संघटनात्मक कामात सक्रिय भूमिका पार पाडली.

कैलास बारणे यांना समाजकारणाचा दीर्घ अनुभव असून शहरातील सर्वसामान्य नागरिकांशी त्यांचा सातत्याने संपर्क आहे. २०१७ च्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून काम करताना त्यांनी विविध विकासकामांमध्ये सहभाग नोंदविला होता. त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि शहर विकासाबाबतची तळमळ लक्षात घेता त्यांना पुन्हा सभागृहात काम करण्याची संधी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
नगरसेवक संदीप वाघेरे, यश साने तसेच नगरसेविका माया बारणे यांच्या समर्थनासह हे निवेदन देण्यात आले आहे. स्वीकृत सदस्य निवड प्रक्रियेत अनुभवी व कार्यक्षम नेतृत्वाला प्राधान्य द्यावे, असा आग्रहही यावेळी धरण्यात आला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version