Spread the love
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस पूर्णवेळ आयुक्त नेमावा – रविराज काळे आप शहराध्यक्ष
       पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 पार पडून नविन महापौरांची निवड झाली आहे. प्रशासनाच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे असलेले आयुक्तपद चार महिने झाले तरी प्रभारी आहे. त्यामुळे शहरातील विकासकामे आणि दैनंदिन नागरी सेवा यावर परिणाम होत आहे.
महापालिका आयुक्तपदावरून शेखर सिंह यांची बदली केली. त्यांच्याकडे नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी सोपविल्यानंतर ‘महामेट्रो’चे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार देण्यात आला होता; परंतु नवीन पूर्णवेळ आयुक्त देण्याचा निर्णय सरकारकडून का लांबणीवर पडला आहे हा संशोधनाचा विषय आहे . त्याचा महापालिकेतील विकासकामांवर विपरीत परिणाम होत आहे. 
           शहरात अनेक महत्त्वाच्या नागरी समस्या प्रलंबित असून, त्यावर तातडीने निर्णय होणे आवश्यक आहे. पूर्णवेळ आयुक्त नसल्याने या प्रश्नांकडे अपेक्षित लक्ष दिले जात नाही.आम्ही नागरिक तक्रारी घेऊन गेल्यानंतर आयुक्त महापालिकेत भेटत नाहीत.प्रशासकीय राजवट संपल्यानंतर शहराच्या विकासाला वेग देण्याची अपेक्षा होती परंतु पूर्णवेळ आयुक्त नसल्याने प्रशासनाला ठोस दिशा मिळत नसल्याची आमची भावना आहे.त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी आपण मुख्यमंत्री म्हणून तातडीने कायमस्वरूपी आयुक्त नेमावा अशी आमची मागणी आहे.
      श्रावण हार्डिकर यांच्याकडे एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे ते महापालिकेत नागरिकांना भेटत नाहीत. महापालिकेतील नवीन विकासकामांना मंजुरी, अर्थसंकल्प, निविदा,शहरात अनियमित पाणीपुरवठा – कचरा संकलन व प्रक्रिया व्यवस्थेतील त्रुटी,अपूर्ण राहिलेले रस्ते, पूल आणि पायाभूत सुविधा प्रकल्प
आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये विलंब होत आहे. आपण तातडीने पुर्णवेळ आयुक्तांची नेमणूक करून आम्हा नागरिकांना दिलासा द्यावा.आपण केलेल्या कार्यवाही संदर्भात आम्हास लेखी उत्तराद्वारे कळवावे.अशी विनंती.आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष रविराज काळे यांनी केली आहे.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version