Spread the love

 

औंध,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामर्थ्य फाउंडेशन यांच्या वतीने बौद्धिक दिव्यांग विशेष मुलांच्या पुनर्वसन व विकासासाठी ‘सारथी संसाधन मेळावा’चे आयोजन बालकल्याण संस्था येथे करण्यात आले. या उपक्रमात एकूण १०६ बौद्धिक दिव्यांग मुलांनी सहभाग नोंदवला.

मेळाव्यात बालरोगतज्ञ, विशेष शिक्षक, व्यवसायोपचार तज्ञ, भौतिकोपचार तज्ञ, नेत्रचिकित्सक, दंतचिकित्सक तसेच विविध डॉक्टर्स व थेरपिस्ट यांच्यासह २५ पेक्षा अधिक तज्ञांनी मार्गदर्शन केले. शासकीय योजना, विशेष आधार कार्ड आदी सेवांची माहितीही पालकांना देण्यात आली. एकाच छताखाली सर्व आवश्यक सेवा उपलब्ध झाल्यामुळे सहभागी कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण होते.

या उपक्रमासाठी ICDS, DEIC औंध सिविल हॉस्पिटल, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे, सप्तश्री फाउंडेशन व बालकल्याण संस्था यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर बच्चे (महामंत्री, पिंपरी-चिंचवड भाजपा), डॉ. अमनप्रीत कौर (बजाज CSR), मा. मनीषा बिरारीस (नोडल अधिकारी, CDPO), डॉ. प्रफुल कापसे (MIHM), डॉ. मीनाक्षी व डॉ. संध्या (DEIC) उपस्थित होते.
संस्थेच्या संस्थापिका डॉ. शिवानी पंडित यांनी प्रास्ताविक केले.

तर व्यवस्थापक सौरभ शिंदे यांनी नियोजन व सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. सामर्थ्य फाउंडेशन टीम, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवकांच्या परिश्रमामुळे हा मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version