कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच जैन भवन योजना जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली,, भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी, महर्षि आऩद सेवा प्रतिष्ठान या संस्थांचे अध्यक्ष तसेच तसेच रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी चे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त कासारवाडी येथील जैन स्थानकात नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले सदर शिबिरामध्ये डॉ एस एस पारख भोसरी, यांनी रुग्णांची तपासणी केली.
या शिबिरात एकूण 142 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली आणि 107 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिरासाठी महर्षि आनंद सेवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संदीप फुलफगर सचिव प्रणित बागमार यांनी विशेष परिश्रम घेतले यावेळी कासारवाडी संघाचे अध्यक्ष विलास पगारिया तसेच अनिल कटारिया , रमणलाल कर्नावट ,सतीष मोदी, किरण भंडारी ,महावीर कुवाड संदीप कर्नावट ,कल्पेश पगारिया, कमलेश कोठारी , चंदन बरडिया तसेच मुख्य संयोजक डॉ अशोककुमार आणि सौ लता पगारिया आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ अशोककुमार पगारिया यांच्या सौजन्याने गेली १० वर्षांपासून सदर मोफत नेत्र चिकित्सा आणि चष्मे वाटप शिबिराचे आयोजन केले जात आहे.
