Spread the love

शिर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महासंघ यांच्या तिर्थ शिर्डी येथे आयोजित राज्यव्यापी अधिवेशनात महत्त्वपूर्ण पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. ही निवड लक्ष्मणराव झणझणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संघ यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते करण्यात आली.
श्री यादव त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्यातील सक्रिय सहभाग, कायदेशीर जाण आणि प्रशासकीय समन्वय क्षमतेच्या आधारे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

तसेच पिंपरी-चिंचवड पुणे अध्यक्षपदी श्री सचिन कदम यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास अधिवेशनात व्यक्त करण्यात आला.

दरम्यान, संजय पाटील यांची पुणे विभाग सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या अनुभवाचा लाभ संघटनेच्या विस्तारासाठी व युवकाभिमुख उपक्रमांना चालना देण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे राज्यातील कौशल्य विकास चळवळीला अधिक बळ मिळून युवकांसाठी विविध प्रशिक्षण व रोजगाराभिमुख उपक्रमांना चालना मिळेल, असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला.

राज्य स्तरावर मार्गदर्शक ऍडव्होकेट  विशाल डोंगरे यांची एकमताने निवड करण्यात आली या प्रसंगी सर्व नवनिर्वाचित
पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या .

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version