Spread the love

 

​आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा संस्थान, श्री क्षेत्र आळंदी देवाची यांच्या वतीने राष्ट्रसंत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी संस्थेच्या आळंदी येथील धर्मशाळेत हा उत्सव उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व कष्टकऱ्यांचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी दिली आहे.

​या सोहळ्याचे उद्घाटन माजी सामाजिक न्याय मंत्री मा. बबनराव घोलप यांच्या हस्ते होणार असून, भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा. महेश दादा लांडगे यांच्या शुभहस्ते आळंदीचे नगराध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवकांचा विशेष नागरी सत्कार करण्यात येणार आहे.

​कार्यक्रमाची रूपरेषा:
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ९ ते ११ या वेळेत सुश्राव्य ‘संगीत भजन’ कार्यक्रमाने होईल. त्यानंतर सकाळी ११ वाजता मुख्य सोहळ्यास प्रारंभ होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मा. हेमंत हराळे सर यांच्या हस्ते संत शिरोमणी रोहिदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येईल. याप्रंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. ज्ञानेश्वरजी कांबळे, मा. शशिकांत सोनवणे उपस्थित राहणार आहेत.

​समाज बांधवांना उपस्थितीचे आवाहन:
“संत रोहिदास महाराज हे समता, भक्ती आणि सामाजिक न्यायाचे दीपस्तंभ आहेत. त्यांचा वारसा जपण्यासाठी आणि समाज संघटित करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले आहे. तरी महाराष्ट्रभरातील सर्व जिल्हा, शहर आणि गावांमधील भाविक बंधू-भगिनींनी आणि समाज बांधवांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे आवाहन डॉ. बाबा कांबळे व निमंत्रक ह.भ.प. बाळासाहेब चव्हाण (सचिव) यांनी केले आहे.

​कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अनिल सातपुते (कार्याध्यक्ष), श्रीमती मधुरा मोहन डांगे (खजिनदार), नारायण श्रीपती गाडेकर (व्यवस्थापक) यांच्यासह समस्त विश्वस्त, सल्लागार मंडळ व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
​कार्यक्रमाची वेळ व ठिकाण:
​वेळ: शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६, सकाळी ९:०० वाजल्यापासून.
​स्थळ: समस्त हराळे वैष्णव समाज धर्मशाळा, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे.
​संपर्क: ९७६४१०६८२३ / ८६६८९५२९५६

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version