Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साऊज्योती फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका जीवनगौरव पुरस्कार लता अण्णा नवले (शितल भानुदास औटी) यांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान सुभेदार महेंद्र गवई, डॉक्टर शंकर अदानी तसेच प्रसिद्ध अभिनेते बाळराजे वाळुंजकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

लता अण्णा नवले सध्या श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर, आकुर्डी, पुणे–३५ येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असून शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले समर्पित कार्य, सामाजिक भान आणि शिक्षणप्रेम यामुळे त्या आदर्श शिक्षिकेचा मान मिळविण्यास पात्र ठरल्या आहेत.
या सन्मानामुळे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिक्षकांना प्रेरणा मिळेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version