Spread the love
वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार 
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  वकिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन पिंपरी चिंचवड” ही वकील संघटना स्थापन केली आहे. असे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सचिन पानी यांनी सांगितले. 
    तसेच ही संघटना सर्वच वकिलांसाठी कार्य करेल अशी ग्वाही ॲड. पानी यांनी यावेळी  दिली.
   पिंपरी, मोरवाडी कोर्ट येथे “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन पिंपरी चिंचवड” या वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ पिंपरी मोरवाडी कोर्ट येथील बार रूम कक्षात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अरूण खरात, प्रमुख मार्गदर्शक ॲड. राकेश अकोले, बी. के. कांबळे, प्रकाश निनाळे, रमेश गालफाडे, केशव घोगरे, प्रमिला गाडे आदी वकील उपस्थित होते.
   यावेळी ॲड. संगीता कुशालकर यांना महिला सहसचिव, सहसचिव ॲड. संजय माने, सहायक सहसचिव पदी ॲड. सुनील डोंगरे, प्रसिद्धी प्रमुखपदी निवड केल्याचे ॲड. तेजस सरतापे यांना विशेष नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
   तसेच उपाध्यक्ष ॲड. सुनील माने, सचिव ॲड. तेजस चवरे, महिला सचिव ॲड. आरती अकोले, सहसचिव ॲड. प्रशांत बचुटे, महिला सहसचिव ॲड. स्नेहा कांबळे, हिशोबनीस ॲड. ऋषिकेश शिनगारे, खजिनदार ॲड. अशोक बडेकर, सदस्य ॲड. नागनाथ सूर्यवंशी, मनोहर सोनवणे, संघर्ष सूर्यवंशी, अविनाश कांबळे, सागर पोवार, महेश जानकर, ओंकार नाणेकर, पल्लवी कुराडे, चांगुणा काकडे आदी कार्यकारिणीतील वकील पदाधिकारी व सदस्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
    यावेळी ॲड. समीर चव्हाण यांनी नवीन वकील संघटना स्थापन करण्याचा उद्देश सांगितला. बार आणि बेंच मधील संबंध चांगल्या प्रकारे प्रस्थापित करण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे. असेही त्यांनी सांगितले.
    ॲड. अरुण खरात यांनी या नवीन कार्यकारिणीस पाठिंबा व्यक्त केला. त्याचबरोबर ॲड. पी. एस. कांबळे, ॲड. सुनील कडूसकर यांनी कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या.
    सूत्रसंचालन ॲड. तेजस चवरे व ॲड. प्रशांत बचुटे यांनी केले.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version