Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी, निर्णयक्षम आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व गमावले आहे. सर्वसामान्य नागरिक कामगारासोबतची आपुलकी आणि काम होणार आहे तर होणारच आणि न होणारे होणारच नाही अशी ठाम भूमिका मांडणारे अजितदादा होते, त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे अशी भावना कष्टकरी कामगारांनी आज श्रद्धांजली वाहत व्यक्त केली.
सुनिता पोतदार “म्हणाल्या विषय कोणताही असो त्यावर त्वरित मत स्पष्ट करणे आणि संबंधित मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून निर्णय घेणे ही त्यांची कार्यशैली होती.”
 राजेश माने म्हणाले की “निवेदन दिल्यानंतर ते लगेचच सोबत असलेल्या स्वीय सहाय्यकांना संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवण्याचे आदेश द्यायचे.”
माधुरी जलमूलवार म्हणाल्या की “घरेलू कामगारांच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर त्यांनी घरेलू कामगार कल्याणकारी महामंडळासाठी तरतूद केली”.
इरफान चौधरी म्हणाले “फेरीवाला कायद्याबाबत निवेदन देऊन चर्चा केल्यास ते नेहमी प्रश्न समजून पुढे काम करायचे .”
 राम बिराजदार म्हणाले की, रिक्षाचालक यांच्याबाबत अजितदादा आणि चर्चा केल्यानंतर त्यांनी तातडीने आरटीओ विभागास संबंधित काम करण्यास सांगितले”
राजू बिराजदार म्हणाले “कामगार, कष्टकरी आणि असंघटित घटकांच्या न्यायासाठी  बोलणार नेतृत्व आपल्यातून निघून गेले आहे असा नेता पुन्हा होणे नाही”, कामगारांनी आपल्या भावना व्यक्त करत आठवणीना उजाळा दिला.
अजितदादा यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक अनुभवी, निर्णयक्षम गमावला असून महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवेल.
कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ, घरेलू कामगार संघर्ष महासंघ, बांधकाम कामगार महासंघ, कष्टकरी रिक्षा टॅक्सी महासंघातर्फे तमाम कामगाराकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.
यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, मनापासून सदस्य राजू बिराजदार, किरण साडेकर, किसन भोसले, सचिव तुषार घाटोळे, अनिल बारवकर, इरफान चौधरी, सुनील भोसले, लता भोसले, वंदना चव्हाण, अनिता मुळे, विजया भोसले आदी उपस्थित होते.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version