Spread the love
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  विद्युत वाहने, नवीकरणीय ऊर्जा, ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मोबिलिटी, क्वांटम तंत्रज्ञान व अनुप्रयुक्त संशोधन या क्षेत्रांमध्ये भारत जर्मनी सहकार्य झाले, तर ऊर्जा संक्रमण व प्रगत मोबिलिटी सोल्यूशन्समध्ये जर्मनीकडे असलेले जागतिक कौशल्य भारतीय संशोधकांना संयुक्त संशोधनासाठी उपयोगी ठरेल. यातून व्यापक सहकार्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील असा विश्वास जर्मनीतील कार्लस्रुहे शहराचे महापौर डॉ. फ्रँक मेंट्रुप यांनी व्यक्त केला. तसेच १९९० पासून पीसीईटीने उच्च शिक्षण आणि संशोधन, रोजगार यासाठी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले.
   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) कार्यालय आणि साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू), पुणे येथे जर्मनीतील कार्लस्रुहे शहराचे महापौर डॉ. फ्रँक मेंट्रुप यांच्यासह उच्चस्तरीय जर्मन शिष्टमंडळाने नुकतीच भेट दिली. या भेटीचा मुख्य उद्देश शैक्षणिक सहकार्य, संयुक्त संशोधन, प्राध्यापक देवाणघेवाण, नवोन्मेष तसेच उद्योग, उच्च शिक्षण भागीदारी या विषयांवर सखोल चर्चा करणे हा होता.
   पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी जर्मन शिष्टमंडळाचे स्वागत केले व पीसीईटी आणि पीसीयू च्या वाढत्या आलेखाची माहिती दिली.
    यावेळी कार्लस्रुहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (केआयटी) या जर्मनीतील अग्रगण्य अभियांत्रिकी व नैसर्गिक विज्ञान केंद्र व संशोधन विद्यापीठाचे प्रतिनिधी, सिंगापूर गोविन होल्डिंग्सचे ग्रुप सीईओ डॉ. आनंद गोविंदालुरी, पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे, पीसीयू नियामक मंडळ सदस्य सचिन इटकर, आंतरराष्ट्रीय सल्लागार डॉ. दिनेश अमळनेरकर, सेंटर फॉर युरोपियन स्टडीजच्या प्रमुख डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, संचालक, संशोधन व विकास डॉ. भरत काळे, आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देओस्कर, पीसीईटी आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. रोशनी राऊत, पीसीयू स्कूल ऑफ इंजिनिअरिंग डीन डॉ. विजय पाटील, पीसीसीओईआर संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, एसबीपीआयएम संचालक डॉ. किर्ती धारवडकर, एनएमआयइटी संचालक डॉ. प्रमोद पाटील, पीबीएस संचालक डॉ. गणेश राव, एसबीपीसीओएडी प्रभारी प्राचार्य शिल्पा पाटील, एस. बी. पाटील कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स प्राचार्य प्रा. संदीप पाटील, एस. बी. पाटील पब्लिक स्कूल प्राचार्य डॉ. बिंदू सैनी, आयआरसी समन्वयक उपस्थित होते.
  यावेळी गोविंदालुरी यांनी सांगितले की इंडो–जर्मन स्किलिंग उपक्रमांतर्गत दरवर्षी ४,००० हून अधिक कुशल मनुष्यबळ तयार केले जाते, जे महाराष्ट्र शासन व जर्मनी यांच्यातील सामंजस्य करारांमुळे शक्य झाले आहे. तसेच पुणे शहराचेही जर्मनीसोबत करार आहेत आणि भविष्यात महाराष्ट्र व जर्मनी शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास व तंत्रज्ञान हस्तांतरणासाठी अधिक जवळून काम करतील, असा विश्वास व्यक्त केला.
      सूत्रसंचालन डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी केले. पीसीईटी अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ गिरीश देसाई यांनी देखील जर्मनीच्या शिष्टमंडळाला शुभेच्छा दिल्या.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version