Spread the love

 

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री  अजित पवार यांच्या अस्थिकलश दर्शनाचा कार्यक्रम आज मंगळवार, दि. 03 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम पिंपरी येथील मुंबई-पुणे महामार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक प्रांगणात सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत होणार असून, नागरिकांसाठी अस्थिकलश दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

या कार्यक्रमाला आजी-माजी खासदार, आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार आहेत. अस्थिकलश दर्शनानंतर अजितदादा पवार यांच्या अस्थींचे देहू येथील इंद्रायणी नदीत विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामुळे पिंपरी-चिंचवड शहरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले असून, पक्षाच्या नेत्यांसह नागरिक अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version