Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेला गती देणारा केंद्रीय अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केला. या ऐतिहासिक अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.

हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार-प्रसार समिती पिंपरी-चिंचवड शहराचे संयोजक व भाजप शहर महामंत्री मधुकर बच्चे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हा अर्थसंकल्प जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला चार्टर्ड अकाउंटंट बबनराव डांगले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. देशाच्या विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडणारा हा अर्थसंकल्प पाहताना उपस्थितांमध्ये मोठी उत्सुकता व सकारात्मक अपेक्षा दिसून येत होत्या.
हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिक, युवक, शेतकरी, महिला तसेच उद्योजकांसाठी नवी दिशा व नवी आशा देणारा असून विकसित भारताच्या दिशेने देशाला निश्चितच पुढे नेणारा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

यावेळी भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर महामंत्री मधुकर बच्चे, महामंत्री वैशाली खाडेय, मीडिया सेल प्रमुख सागर बिरारी, रोहिणी मांढरे यांच्यासह सीए बबन डांगले, सीए ज्योती वाघमोडे, सीए संतोष वळसनकर, सीए शैलेश बोरे, सीए अमोल इंगळे, सीए ईश्वर मणी, सीए अमोल बोरसे, सीए आदित्य मासुळकर, सीए राहुल तहलानी, सीए किशोर जसवानी, गायत्री तळेकर, महेश साळुंखे, सतपाल गोयल, युवराज लांडे, रवींद्र नांदूरकर, संजय परळीकर तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version