Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपचे सांगवी रहाटणी मंडळाचे उपाध्यक्ष ललित म्हसेकर यांच्या मागणीनुसार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर बस सेवा सासवड मार्गे सुरू करण्यात आली आहे.

सुभाष काटे,  उद्धव कवडे,  रमेश काशीद,  रमेश जगताप नगरसेवक सागर आंघोळकर,  सूर्यकांत गोफने, संजय मराठे , गणेश ढोरे, उमेश बोरसे, सखाराम रेडेकर, सचिन थोरवे, सागर बाविस्कर तसेच महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बसचे लोक लोकार्पण सोहळा पिंपळे गुरव बस स्थानकाजवळ करण्यात आला, यावेळी भाजप शहरध्यक्ष श्री शंकरभाऊ जगताप यांचे सर्व भक्तांकडून मनःपूर्वक आभार व त्यांचे धन्यवाद मान्यता आले.श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाने बसचे स्वागत करण्यात आले.

या बसमुळे पिंपळे गुरव, नवी सांगवी, जुनी सांगवी, दापोडी भागातील नागरिकांना नारायणपूर येथे श्री दत्त महाराजांच्या दर्शनाला जाता येणार आहे. या बस सेवेचा मार्ग पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दर गुरुवारी व पौर्णिमेच्या दिवशी बस मार्ग क्रमांक १८ वाय पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर खडकी बाजार ,पुणे स्टेशन, हडपसर, सासवड या मार्गी सुरू करण्यात आलेली आहे व यावेळी पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर बस चालकांचा सन्मान नारायणपूर श्री दत्त मंदिर येथे उद्योजक विजय पांडुरंग जगताप व मित्र परिवार यांच्या हस्ते करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version