Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘पुणे ग्रॅंड टूर’ ही आंतराष्ट्रीय सायकल स्पर्धा १९ ते २३ जानेवारी दरम्यान पुण्यात होत आहे. स्पर्धेचा पहिला टप्पा मंगळवारी (ता. २०) पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीण हद्दीत पार पडणार आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांत वाहतूकीमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतची तात्पुरती अधिसूचना जारी केली आहे.

त्यानुसार, मंगळवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत स्पर्धेच्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी आहे. हिंजवडी, देहूरोड, निगडी व वाकड वाहतूक विभागातील अनेक प्रमुख चौक व रस्त्यांवरुन वाहतूक वळविण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन आधीच करावे, अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version