Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी येथील श्री तुळजाभवानी माता मंदिर परिसरात  )रविवार, दि. १८ )  श्री महाकालिका देवी वर्धापन दिन सोहळा तसेच मकरसंक्रांतीनिमित्त समाजातील महिला भगिनींसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड आणि मावळ त्वष्टा संस्थेच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमाला संस्थेचे विद्यमान अध्यक्ष  किशोर पिंपळे, माजी अध्यक्ष  मधुकर पोरे, राधिका बोर्लिकर यांच्यासह कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला हा कार्यक्रम भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात पार पडला.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध करमणुकीचे खेळ आयोजित करण्यात आले होते. या खेळांचे आयोजन सौ. राधिका ताई बोर्लिकर यांनी अत्यंत उत्तम पद्धतीने केले. खेळांमधून विजयी ठरलेल्या महिलांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव करण्यात आला, त्यामुळे कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली.

महिलांनी आपल्या दैनंदिन कामांतून वेळ काढून मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रम यशस्वी केला. यावेळी श्री महाकालिका देवीची ओटी भरून देवीची सामूहिक आरती सर्व उपस्थित बंधू-भगिनींच्या हस्ते भक्तिभावाने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी चहापान व अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. आनंद, भक्ती आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या मनावर सकारात्मक ठसा उमटवत कार्यक्रमाची सांगता झाली.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version