Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ (चिंचवड गावठाण–केशवनगर ) येथील भारतीय जनता पार्टी व आरपीआय (आठवले) युतीच्या प्रचाराची सोमवारी सायंकाळी भव्य पदयात्रेने सांगता झाली. चापेकर चौक येथून सुरू झालेल्या या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भाजपच्या अधिकृत उमेदवार अपर्णा निलेश डोके, मनीषा योगेश चिंचवडे, ॲड. मोरेश्वर ज्ञानेश्वर शेडगे आणि  सुरेश भोईर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या प्रचार पदयात्रेत कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण मार्गावर ‘कमळ’ चिन्हाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

गांधी पेठ, तलाठी ऑफिस परिसर, भीमनगर, केशवनगर, कुंडल इस्टेट, गोयल गार्डन, तानाजीनगर, शिवाजी उद्यान परिसर आदी भागांतून पदयात्रा मार्गस्थ होत जनतेशी थेट संवाद साधण्यात आला. विकासकामे, मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सुरक्षितता या मुद्द्यांवर मतदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

प्रचाराच्या अखेरच्या दिवशी झालेल्या या शक्तिप्रदर्शनामुळे भाजपची संघटनात्मक ताकद स्पष्टपणे दिसून आली. जनतेचा वाढता पाठिंबा पाहता प्रभाग १८ मध्ये भाजप-आरपीआय युतीला मोठे यश मिळेल, असा विश्वास उमेदवार व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. प्रचाराची सांगता हीच भाजपच्या विजयाची नांदी ठरेल, असे चित्र सध्या परिसरात दिसून येत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version