Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असताना प्रभाग क्रमांक २२ मध्ये  विनोद नढे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचारात ठळक मुसंडी मारल्याचे चित्र दिसून येत आहे. ‘निश्चयाचा महामंत्र, जनसेवेचा आधार, कर्तृत्ववान नेतृत्व आणि विकासाचे प्रगतशील पाऊल’ या विचारधारेवर आधारित प्रचारामुळे संपूर्ण प्रभागात भाजपच्या बाजूने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
इतर प्रभागांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची राजकीय धूळ उडत असताना, प्रभाग २२ मध्ये भाजपचे उमेदवार विरोधकांवर टीका-टिप्पणी न करता केवळ विकासकामे, स्मार्ट काळेवाडीची संकल्पना आणि भविष्यातील नियोजन या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून प्रचार करत असल्याचे दिसून येत आहे. “फक्त विकास कामे” हा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत असून, मतदारांमध्ये त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आज दिवसभर उमेदवार, पदाधिकारी, हितचिंतक आणि भाजपा कार्यकर्त्यांनी घरोघरी भेटी देत संपूर्ण प्रभागात प्रचाराला वेग दिला. या दरम्यान अनेक ठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे गळाभेट घेत भावना व्यक्त केल्या. काही क्षण असे होते की शब्द अपुरे पडले आणि भावना आपसूकच व्यक्त झाल्या.
विशेषतः भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद नढे यांना पाहून नागरिक भारावल्याचे दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. त्यांच्या कार्यशैलीवर, सातत्यपूर्ण जनसंपर्कावर आणि विकासाभिमुख भूमिकेवर जनतेचा विश्वास असल्याचे या भेटीगाठींतून स्पष्ट झाले.

“शब्द कमी पडले, भावना बोलल्या—विनोदभाऊंना पाहून जनता भारावली,” अशी भावना अनेक मतदारांनी व्यक्त केली.प्रचाराच्या या अंतिम टप्प्यात प्रभाग २२ मध्ये भाजपने निर्माण केलेली सकारात्मक लाट निवडणुकीच्या निकालावर निर्णायक प्रभाव टाकेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version