Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ चऱ्होली बु. येथील उमेदवार नितीन आप्पा काळजे यांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ डुडुळगाव येथील पवित्र अडबंगनाथ महाराज मंदिरात करण्यात आला. दर्शन व आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात आल्याने या कार्यक्रमाला धार्मिकतेसोबतच राजकीय महत्त्व प्राप्त झाले.

यावेळी परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच युवक–महिलांची मोठी उपस्थिती दिसून आली. “चऱ्होली बु. परिसराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधांचे बळकटीकरण आणि पारदर्शक कारभार” ही आपली प्रमुख भूमिका असल्याचे नितीन आप्पा काळजे यांनी यावेळी सांगितले. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य सुविधा या मुद्द्यांवर भर देत जनतेचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

प्रचाराच्या पहिल्याच दिवशी घराघरांतून मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. स्थानिक प्रश्नांची जाण असलेला, सतत लोकांमध्ये वावरणारा आणि विकासाभिमुख उमेदवार म्हणून नितीन आप्पा काळजे यांची प्रतिमा प्रभागात ठळकपणे पुढे येत आहे. मंदिरातून सुरू झालेला हा प्रचार जनतेच्या आशीर्वादासह विजयाकडे वाटचाल करणारा ठरेल, अशी भावना समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version