Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ अंतर्गत येणाऱ्या किवळे परिसरात गेल्या काही वर्षांत लक्षणीय विकास झाला असून या बदलामागे माजी नगरसेविका प्रज्ञा मनोज खानोलकर यांच्या कार्यकाळातील नियोजनबद्ध आणि लोकाभिमुख विकासकामांचा मोठा वाटा असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा आणि स्थानिक प्रश्नांच्या तात्काळ निराकरणावर भर देत त्यांनी किवळे परिसराचा विकासाचा नवा अध्याय सुरू केला, अशी भावना स्थानिकांमध्ये आहे.

खराब रस्ते, अपुरी ड्रेनेज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आणि सार्वजनिक सोयींचा अभाव या समस्यांनी त्रस्त असलेल्या किवळे भागात खानोलकर यांनी प्राधान्याने अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, सिमेंट काँक्रीट रस्त्यांची कामे, जलनिस्सारण सुधारणा तसेच पथदिवे बसवण्यावर भर दिला. यामुळे पावसाळ्यातील पाणी साचणे आणि वाहतूक कोंडीच्या समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे नागरिक सांगतात.

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांसाठीही त्यांनी विशेष उपक्रम राबवले. उद्याने, खेळाची मैदाने, व्यायाम उपकरणे, तसेच सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारून नागरी जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला. शिक्षण व आरोग्य क्षेत्रातही प्राथमिक शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांच्या सुविधा सुधारण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला.
विकासकामांबरोबरच ‘लोकप्रतिनिधी थेट जनतेच्या दारात’ ही भूमिका घेत प्रज्ञा खानोलकर यांनी नागरिकांच्या तक्रारी तत्काळ ऐकून त्यावर उपाययोजना केल्या. त्यामुळे प्रशासन आणि जनता यांच्यातील दरी कमी झाली असून विश्वासाचे नाते निर्माण झाल्याचे स्थानिक मत आहे.

आज किवळे परिसरात झालेला विकास पाहता “काम बोलते” हीच भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे. प्रभाग क्रमांक १६ मध्ये विकासाचे ठोस काम करणाऱ्या नेतृत्व म्हणून प्रज्ञा मनोज खानोलकर यांचे नाव ठळकपणे घेतले जात असून, त्यांच्या कार्यकाळातील विकासकामे आगामी राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version