Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपच्या उमेदवार अनिता संदीप काटे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक धार चढताना दिसत आहे. घरोघरी सुरू असलेल्या प्रचार दौऱ्यात नागरिकांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि “विजयी भव”चा आशीर्वाद त्यांच्या विजयाचा विश्वास अधिक दृढ करत आहे.

अनिता काटे या सामाजिक कार्यात सक्रिय असून महिलांच्या प्रश्नांपासून ते मूलभूत नागरी सुविधांपर्यंत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे आणि सर्वसामान्यांशी असलेल्या थेट संवादामुळे मतदारांमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. प्रचारादरम्यान पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी हे मुद्दे ठळकपणे मांडले जात असून, या विषयांवर ठोस विकासाचा आराखडा त्यांनी नागरिकांसमोर ठेवला आहे.

“काम करणारा आणि शब्द पाळणारा प्रतिनिधी हवा,” अशी स्पष्ट भूमिका मतदारांकडून व्यक्त होत असून, भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर नागरिकांचा विश्वास असल्याचे चित्र आहे. विशेषतः महिला मतदार आणि ज्येष्ठ नागरिकांचा अनिता काटे यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याने प्रभागात भाजपची बाजू अधिक मजबूत होताना दिसत आहे.
प्रभाग २८ मध्ये प्रचाराची गती वाढत असताना अनिता संदीप काटे यांचा आत्मविश्वासही दुणावला आहे. नागरिकांकडून मिळणारा प्रेमळ प्रतिसाद आणि विजयाचा विश्वास हा त्यांच्या प्रचाराचा प्रमुख आधार ठरत असून, येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग २८ मध्ये भाजपचा झेंडा फडकणार, असा ठाम विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version