Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील राजकीय वातावरण तापू लागले असून भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराला दिवसेंदिवस बळ मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. संघटित आणि शिस्तबद्ध प्रचारयंत्रणेच्या जोरावर भाजपने प्रभागात आपली पकड अधिक मजबूत केल्याचे जाणकारांचे मत आहे.

अलीकडील काळात विविध राजकीय घडामोडींमुळे आणि काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे पक्षाची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे. या घडामोडींमुळे भाजपची लोकांमधील विश्वासार्हता अधिक दृढ झाली असून “विनोद नाही, योग्य भाजप प्रवेशाने भाजपाला नक्कीच ताकद मिळाली आहे,” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळेच अनेक नागरिक स्वयंस्फूर्तीने “आमची भाजप – आपली भाजप” असा नारा देत पक्षाच्या प्रचारात सहभागी होत आहेत.

प्रभागातील विकासकामे, पायाभूत सुविधा, स्वच्छता, रस्ते, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर भाजपने नेहमीच ठोस भूमिका घेतल्याचा दावा स्थानिक कार्यकर्ते करत आहेत. प्रभावी नियोजन, पारदर्शक कारभार आणि विकासाभिमुख धोरणांमुळे भाजपला सर्वसामान्य मतदारांचा विश्वास मिळत असल्याचे चित्र आहे.

सध्या प्रभागात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या बैठका, गाठीभेटी, प्रचार फेऱ्या आणि जनसंवाद कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक महिला बचत गट, युवक मंडळे आणि ज्येष्ठ नागरिकांनी भाजपच्या विचारांशी सहमती दर्शवत पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे.
आजच्या काळात प्रभावी प्रचारासाठी सोशल मीडिया, थेट संपर्क आणि प्रत्यक्ष संवाद यांचा योग्य समन्वय साधत भाजपचा प्रचार सुरू आहे. “आमचा एकच ध्यास – प्रभागाचा सर्वांगीण विकास” या भूमिकेवर ठाम राहत भाजपने प्रचाराची दिशा स्पष्ट केली असून येणाऱ्या निवडणुकीत प्रभागात भाजपचाच वरचष्मा राहील, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version