Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर आज प्रभाग क्रमांक २६ मधील कस्पटे वस्ती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या अधिकृत उमेदवार सौ. सारिका गणेश कस्पटे यांनी प्रचार दौरा केला. या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कस्पटे वस्तीमधूनच उभ्या राहिलेल्या आणि या भागातून महिला नेतृत्व म्हणून पुढे आलेल्या सौ. सारिका कस्पटे यांचे नागरिकांनी मोठ्या आपुलकीने स्वागत केले. घराघरात जाऊन संवाद साधताना नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिले तसेच *“आमच्या वस्तीतील लेक आता नगरसेवक व्हावी”* अशी भावना व्यक्त केली.

दीर्घकाळापासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सौ. सारिका कस्पटे यांची लोकप्रियता या प्रचारातून स्पष्टपणे दिसून आली. महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व स्तरातील लोकांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करत विकासासाठी पाठिंबा दिला.

या प्रचारादरम्यान परिसरातील नागरी समस्या, पाणी, रस्ते, स्वच्छता, महिला सक्षमीकरण यावर चर्चा झाली. “सतत लोकांमध्ये राहून काम करणारे नेतृत्व हवे आहे,” असे सांगत नागरिकांनी सौ. सारिका कस्पटे यांना भरभरून शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

‘तुतारी वाजवणारा माणूस’ या निवडणूक चिन्हाखाली लढत असलेल्या सौ. सारिका गणेश कस्पटे यांच्या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक २६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अधिक बळ मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version