Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजपचे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे संदेश काटे यांनी निवडणूक रणांगणात जोरदार तयारी सुरू केली आहे. संघटन कौशल्य, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाच्या जोरावर संदेश काटे यांनी अल्पावधीतच प्रभागात आपली ठळक ओळख निर्माण केली आहे.

प्रभाग २८ मधील युवक, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये संदेश काटे यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत असून “काम करणारा, संवाद साधणारा आणि समस्या तातडीने मार्गी लावणारा नेता” अशी त्यांची प्रतिमा तयार झाली आहे. विशेषतः युवकांमध्ये त्यांचे नेतृत्व आशेचे केंद्र ठरत असून रोजगार, क्रीडा सुविधा, डिजिटल सेवा आणि आधुनिक पायाभूत सुविधांबाबत त्यांनी मांडलेली स्पष्ट भूमिका मतदारांचे लक्ष वेधून घेत आहे.
ग्रामीण आणि नागरी भागांचा समावेश असलेल्या या प्रभागात पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा आणि स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर संदेश काटे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे स्थानिक नागरिक सांगतात. ग्रामस्थांशी थेट संवाद, बैठका, घराघरात जाऊन समस्या जाणून घेण्याची पद्धत यामुळे त्यांच्याबद्दल विश्वास वाढत आहे.

भाजपच्या संघटनात्मक ताकदीची साथ, वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे प्रभाग २८ मध्ये प्रचाराला वेग आला आहे. “विकास, पारदर्शकता आणि तरुण नेतृत्व” या त्रिसूत्रीवर संदेश काटे यांनी निवडणूक लढवण्याची तयारी केल्याने प्रतिस्पर्ध्यांच्या गोटातही हालचाली वाढल्या आहेत.
एकूणच प्रभाग क्रमांक २८ मध्ये संदेश काटे हे भाजपचे आश्वासक युवा नेतृत्व म्हणून पुढे येत असून, युवकांचा व ग्रामस्थांचा एकमुखी पाठिंबा त्यांना निवडणुकीत कितपत यश देतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version