Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कृष्णानगर येथे मथुरा स्वीटजवळ असलेल्या एका कारखान्याला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. मात्र या आगीत मोठी दुर्घटना टळली ती सामान्य कार्यकर्ता व स्थानिक उमेदवार मारुती गणपत जाधव यांच्या तत्परतेमुळे. घटनेची माहिती मिळताच मारुती जाधव यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीची उपाययोजना सुरू केली.

अवघ्या १० मिनिटांच्या आत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या काळात कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच मोठे आर्थिक नुकसानही टळले. स्थानिक उमेदवार असल्यामुळे परिसराची अचूक माहिती, नागरिकांशी असलेला थेट संपर्क आणि संकटसमयी निर्णय घेण्याची क्षमता याचा फायदा सर्वांनाच झाला.

“आपला माणूस संकटात धावून येतो” हे पुन्हा एकदा सिद्ध करत मारुती गणपत जाधव यांनी राजकारण म्हणजे केवळ निवडणूक नाही, तर जनतेच्या अडचणींमध्ये खंबीरपणे उभे राहणे असते, हे दाखवून दिले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानत ‘सर्वांचा साथी – आपला मारुती’ अशी भावना व्यक्त केली आहे.
ही घटना स्थानिक पातळीवर नेतृत्वाची गरज आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली असून, येत्या राजकीय घडामोडींमध्ये याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version