Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत उमेदवारास सम्यक स्वयं सेवा संस्था यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

सम्यक स्वयं सेवा संस्था (पिंपरी चिंचवड) यांच्यावतीने काढण्यात आलेल्या जाहीर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सामाजिक न्याय, महिला सक्षमीकरण, युवक रोजगार, झोपडपट्टी पुनर्वसन, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत नागरी सुविधा या विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची भूमिका ठोस व विकासाभिमुख आहे.

प्रभाग क्रमांक ९ मधील पाणीपुरवठा, गटारे, रस्ते, वीज, आरोग्य सेवा, बेरोजगारी आणि महिला सुरक्षिततेसारख्या ज्वलंत प्रश्नांवर प्रभावी काम करण्याची क्षमता उमेदवारांकडे असल्याचा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.

सम्यक स्वयं सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ बनसोडे यांनी सांगितले की, सदर उमेदवार लोकांशी थेट संवाद साधणारे, स्वच्छ प्रतिमेचे, संघर्षशील व विकासाभिमुख नेतृत्व देणारे आहेत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासनासाठी त्यांचा विजय आवश्यक आहे.

यावेळी संस्थेने प्रभाग क्रमांक ९ मधील सर्व नागरिकांना जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन विकास व सामाजिक न्यायासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version