पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, शरद नगर परिसरात सुरू असलेल्या प्रचाराला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रचाराच्या प्रत्येक टप्प्यावर मिळणारे प्रेम, विश्वास आणि पाठबळ यामुळे उमेदवारांचा आत्मविश्वास अधिक दृढ होत आहे.
प्रभाग ११ मधील शरद नगर येथे घराघरांतून होत असलेल्या प्रचारादरम्यान नागरिकांनी उमेदवारांशी थेट संवाद साधत विकासाबाबतच्या अपेक्षा मांडल्या. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण व मूलभूत नागरी सुविधा या प्रश्नांवर ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबवण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले.
प्रभाग ११ मधील उमेदवार नारायण सदाशिव बहिरवाडे, सौ. सत्यभामा संजय नेवाळे, ॲड. मयुरी निलेश साने आणि श्री. मारुती गणपत जाधव यांना मिळणारा वाढता जनसमर्थनाचा ओघ म्हणजे विकास, विश्वास आणि परिवर्तनाकडे नेणारी ठोस पावले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
उमेदवारांनी स्पष्ट केले की, जनतेच्या सेवेसाठी एकजुटीने, ठाम निर्धाराने आणि प्रामाणिक निष्ठेने काम करण्याचा आमचा संकल्प आहे. नागरिकांचा विश्वास हीच आमची खरी ताकद असून, प्रभाग ११ चा सर्वांगीण विकास हाच आमचा एकमेव अजेंडा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
