Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ (पुनावळे–ताथवडे) मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे युवा नेतृत्व चेतन पवार यांनी आक्रमक प्रचाराची रणधुमाळी सुरू केली आहे. पुनावळे आणि ताथवडे परिसरात घरोघरी भेटी देत त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला असून, या प्रचाराने संपूर्ण प्रभागात राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे.

“विकास, पारदर्शकता आणि स्थानिक प्रश्नांचे ठोस निराकरण” हाच आपला अजेंडा असल्याचे चेतन पवार यांनी स्पष्ट करताना, मागील काळातील अपूर्ण विकासकामांवर सत्ताधाऱ्यांना थेट लक्ष्य केले. नागरिकांच्या पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि स्वच्छता या मुद्द्यांवर त्यांनी आक्रमक भूमिका मांडत, प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच आपला ध्यास असल्याचा निर्धार व्यक्त केला.

घरोघरी प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, “युवा नेतृत्वाला संधी द्या” अशी भावना मतदारांमध्ये दिसून येत आहे. उबाठा गटाच्या या आक्रमक प्रचारामुळे विरोधकांची चांगलीच धावपळ उडाल्याचे चित्र असून, प्रभाग २५ मधील लढत आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version