Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरीतील व्यापारी वर्गाने भारतीय जनता पक्षाला उघड पाठिंबा दर्शवला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून विविध धोरणांद्वारे व्यापारी वर्गाला सातत्याने पाठबळ दिले असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी सांगितले. पारदर्शक करप्रणालीमुळे व्यवसाय करणे सुलभ झाले असून, त्यामुळे सरकारने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. म्हणूनच आम्ही भाजपसोबत आहोत, असा ठाम विश्वास पिंपरीतील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.

पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर, अशोक थिएटर परिसरातील प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजपा–आरपीआय (आठवले गट) चे अधिकृत उमेदवार सौ. उषाताई वाघेरे, मोनिका ताई निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी यांनी व्यापारी बांधवांच्या गाठीभेटी घेत थेट संवाद साधला. व्यापाऱ्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासात्मक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.

प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजप उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतली असून, ‘होम टू होम’ प्रचारानंतर आता व्यापारी वर्गाशी थेट संवादावर भर देण्यात येत आहे. यावेळी उपस्थित सर्वच व्यापाऱ्यांनी भाजप उमेदवारांना एकमुखी पाठिंबा दर्शवला असून, भरघोस मताधिक्याने निवडून देऊ, असा विश्वासही उमेदवारांना दिला आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version