Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेनेच्या प्रचाराला वेग आला आहे. संत तुकाराम नगर, वल्लभनगर, महात्मा फुलेनगर, लांडेवाडी, कासारवाडी आणि नाणेकर चौक या भागांचा समावेश असलेल्या या प्रभागात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना जनसामान्यांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

शिवसेना महानगरप्रमुख राजेश चिमणराव वाबळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत प्रचाराची धुरा सांभाळली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य तसेच मूलभूत नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांवर उमेदवार ठोस भूमिका मांडत थेट नागरिकांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत प्रभाग २० मध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याचे स्थानिक मतदारांमध्ये चर्चिले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जनहितकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला असून खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचा विकास करण्याची ग्वाही देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक २० हा आदर्श आणि समस्यामुक्त प्रभाग म्हणून विकसित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे राजेश वाबळे यांनी प्रचारादरम्यान स्पष्ट केले. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या प्रभागातून शिवसेनेतर्फे विनोद नामदेव वाघमारे, वैशाली राजेश वाबळे, स्वीटी निलेश मलातपुरे आणि राजेश चिमणराव वाबळे हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सामाजिक कार्याचा अनुभव, मजबूत जनसंपर्क आणि सातत्यपूर्ण उपस्थिती यामुळे मतदारांमध्ये या पॅनलविषयी विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राज्य शासनाच्या महिलाभिमुख योजनांचा थेट लाभ मिळाल्यामुळे महिला मतदारांचा कल मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे झुकलेला दिसत आहे. प्रचारादरम्यान महिलांचा उत्स्फूर्त सहभाग हे या प्रचाराचे विशेष वैशिष्ट्य ठरत असून, राजेश वाबळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासकामांचा अनुभव आणि सातत्यपूर्ण संपर्क ही शिवसेना पॅनलची प्रमुख ताकद मानली जात आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version