पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १६ (ब) मध्ये ओबीसी महिला राखीव जागेसाठी कु. प्रज्ञा महेश खानोलकर (MBA) यांनी जोरदार आघाडी घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक बांधिलकीतून विकासकामांचा धडाका लावणाऱ्या प्रज्ञा खानोलकर यांनी “काम करत आलोय, काम करत राहू” हा निर्धार मतदारांसमोर ठामपणे मांडला आहे.
रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवकांसाठी रोजगाराभिमुख उपक्रम, तसेच मूलभूत नागरी सुविधांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. त्यांच्या कामाची दखल घेत मतदारांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत असून, प्रत्येक गल्लीतून एअर कंडिशनर (AC) या चिन्हाला भरघोस पाठिंबा वाढताना दिसत आहे.
प्रचारादरम्यान विरोधकांचे आरोप त्यांनी ठोस कामगिरीने फोल ठरवले असून, विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक लढवण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. “फक्त आश्वासन नाही, प्रत्यक्ष काम” ही ओळख बनवलेल्या प्रज्ञा खानोलकर यांचा प्रचार वेग घेत असताना, प्रभाग १६ (ब) मध्ये विजयाची हवा स्पष्टपणे जाणवते.
