Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक  २५ (पुनावळे–ताथवडे–वाकड) मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार  चेतन महादेव पवार यांच्या प्रचाराला  आज शनिवारी, दि. ३ जानेवारी २०२६ रोजी औपचारिक सुरुवात होणार आहे. पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार असून, त्यानंतर परिसरात भव्य प्रचार दौरा आयोजित करण्यात आला आहे.

या प्रचार दौऱ्याची सुरुवात नृसिंह मंदिर, महादेव मंदिर आणि गणेश मंदिर येथे दर्शन घेऊन होणार आहे. त्यानंतर पंचशील नगर, नरसिंह चौक (प्रभाग क्र. २५ ड) आदी भागांतून पदयात्रा काढण्यात येणार असून, नागरिकांशी थेट संवाद साधत मतदारांचे प्रश्न, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत.
प्रचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व समर्थकांनी तयारीला वेग दिला आहे. प्रभागातील पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य या मुद्द्यांवर आधारित विकासाचा आराखडा प्रचारादरम्यान मतदारांसमोर मांडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मशाल चिन्हावर निवडणूक लढवणारे चेतन पवार हे तरुण, अभ्यासू आणि संघटनात्मक बांधणी मजबूत असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून प्रभागात पारदर्शक प्रशासन आणि सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करत आहेत.

प्रचाराच्या शुभारंभालाच मोठ्या संख्येने नागरिक, शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याने प्रभाग २५  मधील निवडणूक वातावरण तापण्याची चिन्हे असून, आगामी काळात प्रचार अधिक आक्रमक व गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share.
Leave A Reply

Exit mobile version