Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी माघार प्रक्रियेला वेग आला आहे. आजपर्यंत एकूण ३८ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली असून, माघार अर्जांची एकूण संख्या ४१ इतकी झाली आहे.

 
निवडणूक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उद्या शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी उमेदवारी माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी आणखी काही उमेदवार माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माघारीनंतर अनेक प्रभागांमधील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होत असून काही ठिकाणी थेट लढती तर काही प्रभागांत बहुपक्षीय लढती कायम राहणार आहेत.
 
प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांकडूनही अंतिम टप्प्यातील रणनीती आखली जात असून, माघार प्रक्रियेनंतर प्रचार अधिक तीव्र होणार आहे. माघार मुदत संपल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष प्रचाराला अधिकच वेग येणार आहे.
 
नामनिर्देशन मागे घेणाऱ्या उमेदवारांची नावे –
1) अश्विनी निलेश खंडेराव – १० अ
2) रोहिणी प्रसाद रासकर -१० ब 
3) भालदार गुलामअली इब्राहिम -१४ अ 
4) संगिता खेमराज काळे – १५ ब 
5) शुभांगी विलास शिंदे -१५ ब
6) स्मिता जयंत बागल -१५ ब
7) संगिता खेमराज काळे -१५ क 
8) स्मिता जयंत बागल -१५ क 
9) पूजा राजेंद्र सराफ -१८ ब 
10) मनिषा चंद्रहास वाल्हेकर -१७ क 
11) जुनेद अहमद चौधरी -२ क 
12) खान मोहम्मद अरिफ -२ क 
13) लांडगे श्रद्धा रवि – ६ ब 
14) ताठे प्रसाद तुकाराम -६ ब 
15) पंकज शिवाजी पवार -८ अ
 
16) वाघमारे राहुल बाबासाहेब -९ अ
17) अँड. दत्ता हरिश्चंद्र झुळूक -९ अ
18) कांबळे उत्तम संभाजी -९ अ
19) शेरखाने अजय देविदास- ९ अ 
20) राजेश यशवंतराव नागोसे- ९ ड
21) दिपक राजू म्हेत्रे -९ ड
22) भोसले हनुमंतराव भीमराव -९ ड
23) गायकवाड विनय रमेश -२५ अ 
24) मोनिका नितीन दर्शले -२५ ब 
25) वाकडकर राम हनुमंत -२५ ड 
26) गायकवाड ममता विनय -२६ अ 
27) जयनाथ काटे -२८ ड 
28) राजू बाबुराव लोखंडे -२९ क 
29) रणपिसे मधुकर सोपान – २९ ड
30) जगताप अक्षय किसन -२९ ड 
31) भोसले रजनी निखील -३ अ 
32) सचिन किसन लांडगे -५ ड
33) शिंदे भरत किसनराव -५ ड 
34) लोंढे शुभांगी संतोष -७ अ 
35) लोंढे प्रज्वल संतोष -७ अ 
36) साठे कल्याणी -२१ क 
37) बारणे साक्षी तानाजी -२३ ब 
38) आढाव आरती निलेश- ३१ अ
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version