Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक–२०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११(क) मधून सौ. निशा दिनेश यादव यांनी नगरसेवक पदासाठी अपक्ष म्हणून आपला नामनिर्देशन अर्ज दाखल केला आहे. मा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्यांनी अधिकृतरीत्या अर्ज सादर केला.

या वेळी सौ. निशा दिनेश यादव यांनी स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या, विकासकामे, नागरी सुविधा आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत असल्याचे सांगितले. पक्षीय राजकारणापेक्षा जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत पारदर्शक व जबाबदार कारभार करण्याचा आपला निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग ११(क) मधील निवडणूक लढतीत रंगत वाढली असून, स्थानिक पातळीवर विविध राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version