Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक १० (ब) मोरवाडी–संभाजीनगर परिसरात आपली निवडणुकीची तयारी वेगाने सुरू केली आहे. जनतेच्या आशिर्वादाने आणि पक्षाच्या विश्वासावर आज प्रभाग क्रमांक १० (ब) मधून  वर्षा दत्तात्रय भालेराव यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहून भालेराव यांना शुभेच्छा दिल्या.
सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण आणि स्थानिक विकासकामांमध्ये सक्रिय असलेल्या सौ. वर्षा भालेराव यांच्या उमेदवारीमुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटित ताकदीच्या जोरावर प्रभाग १० (ब) मध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून, येणाऱ्या निवडणुकीत हा प्रभाग पक्षासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version