Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आज उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त 1 म्हणून एका दिवसासाठी कु .दुर्गा अभय भोर अध्यक्ष दुर्गा ब्रिगेड संघटना महाराष्ट्र राज्य यांची निवड करण्यात आली याप्रसंगी महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह उपायुक्त जांभळे पाटील तसेच अधिकारी वर्ग उपस्थित होते.

यावेळी विविध विषयावर चर्चा करण्यात आली याप्रसंगी दुर्गा भोर यांनी अतिरिक्त आयुक्त पदाचा मान मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि प्रशासकीय कामकाजाची माहिती त्यामुळे उत्तम प्रकारे मिळाली आणि हा एक आयुष्यामधील खूप मोठा प्रसंग आहे आणि त्याचं नक्कीच पुढील काळामध्ये मी चांगला प्रकारे काम करून समाजाच्या सेवेसाठी वापर करून घेईल तसेच तरुण मतदान वाढले पाहिजे आणि तरुणांमध्ये मतदान प्रक्रिये बाबत संपूर्ण माहिती मिळून समाजामध्ये मतदानाविषयी जागरूकता निर्माण झाली पाहिजे या हेतूने सुद्धा काम करेल तसेच शहरातील प्रश्नांबाबत दुर्गा भोर यांनी काही समस्या बाबत चर्चा केली यामध्ये महिला सुरक्षा असेल शहरात प्रदूषण मुक्तीसाठी इलेक्ट्रिकल वाहन संदर्भात तसेच एमआयडीसी परिसरातील मूलभूत सुविधांबाबत तसेच वाहतुकीबाबत आणि महिला स्वच्छतागृहांबाबत चर्चा करण्यात आली .

शहरांमध्ये कौशल्य विकास केंद्र मोठ्या प्रमाणात निर्माण करून शहरांमध्ये रोजगार आणि उद्योग कशाप्रकारे निर्माण करण्यात येतील या बाजू दुर्गा भोर यांनी मांडल्या याप्रसंगी माननीय आयुक्त शेखर सिंह यांनी सहकार्याची भूमिका घेऊन पुढील काळामध्ये या सर्व मांडलेल्या सूचनांचा नक्कीच विचार करून त्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version