Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून प्रभाग क्रमांक १२ मध्ये भव्य ‘विजयी संकल्प मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वाजता गणेशनगर येथील पांडुरंग पार्क (लक्ष्मी कॉम्प्लेक्सजवळ) येथे होणार आहे.

प्रभाग १२ अंतर्गत येणाऱ्या तळवडे गावठाण, ज्योतिबानगर, गणेशनगर, रुपीनगर, सह्याद्रीनगर व त्रिवेणीनगर परिसरातील नागरिकांसाठी हा मेळावा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी निवडणुकीसाठी संघटन मजबूत करण्याचा आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मेळाव्यात प्रभागातील प्रमुख नेते व संभाव्य उमेदवार श्री. शरद वसंत भालेकर (ओबीसी पुरुष), सौ. चारुलता रितेश सोनवणे (सर्वसाधारण महिला), सौ. सीमा धनंजय भालेकर (सर्वसाधारण महिला) आणि श्री. पंकज दत्तात्रय भालेकर (सर्वसाधारण पुरुष) हे उपस्थित राहणार असून, विकासाचा अजेंडा, स्थानिक प्रश्न व भविष्यातील रणनिती यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हाखाली होणारा हा मेळावा प्रभाग १२ मध्ये पक्षाची ताकद दाखवणारा ठरेल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version